Sunday , November 22 2026
Breaking News

ता.पं., जि.पं. मतदारसंघांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना आज

Spread the love

 

 

२९०० हून अधिक हरकतींची छाननी पूर्ण; मंत्री ईश्वर खांड्रे यांची माहिती

बेंगळुरू : राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, जिल्हा पंचायत (जि.पं.) आणि तालुका पंचायत (ता.पं.) मतदारसंघांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना आज (ता. २०) प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री ईश्वर बी. खांड्रे यांनी दिली.

बेंगळुरू येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, राज्यातील ३० जिल्ह्यांमधील ११०१ जिल्हा पंचायत मतदारसंघ आणि २३४ तालुका पंचायतमधील ३५८० सदस्य जागांच्या आरक्षणाबाबत ९ ऑक्टोबर रोजी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती.

या प्रारूप अधिसूचनेवर १९ ऑक्टोबरपर्यंत हरकती व आक्षेप नोंदविण्यास मुदत देण्यात आली होती. या कालावधीत २९०० हून अधिक हरकती प्राप्त झाल्या. पंचायत राज विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमानुसार सर्व हरकतींची छाननी करून अंतिम आरक्षण अधिसूचना तयार केली आहे. ही अधिसूचना आज प्रसिद्ध केली जाणार असल्याचे खांड्रे यांनी स्पष्ट केले.

अंतिम आरक्षण अधिसूचनेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग येण्याची अपेक्षा आहे.

About Belgaum Varta

Check Also

कावेरी नदी पाणीवाटप प्रकरणात तामिळनाडूला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; अतिरिक्त पाणी सोडण्याची मागणी फेटाळली

Spread the love  बेळगाव : कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यात सुरू असलेल्या वादात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *