Sunday , November 22 2026
Breaking News

बैलहोंगलमध्ये घरफोडी; ३५ लाखांचे सोने-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

Spread the love

 

बेळगाव : घरमालक बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सुमारे ३५ लाख रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना बैलहोंगल शहरातील विनायक नगर येथे गुरुवारी पहाटे उघडकीस आली.

यल्लालिंग तोकलवर यांच्या घरी ही चोरी झाली आहे. मूळचे गोकाक तालुक्यातील शिलतिबावी गावचे रहिवासी असलेले तोकलवर हे कामानिमित्त बंगळुरूला गेले होते. घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

घरातील सुमारे २३ तोळे सोन्याचे दागिने, १४ तोळे चांदीचे दागिने आणि १ लाख २० हजार रुपयांची रोकड असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. चोरी झालेल्या मालमत्तेची एकूण किंमत अंदाजे ३५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, मुरगोड रस्त्यावरील बसवनगर परिसरातही चोरट्यांनी कुलूपबंद असलेल्या दोन घरांना लक्ष्य करून चोरीचा प्रयत्न केला. मात्र, हाती काहीच न लागल्याने चोरटे रिकाम्या हाताने परतले.

घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी डॉ. वीरय्या हिरेमठ, सीपीआय प्रमोद यलिगार यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. याप्रकरणी बैलहोंगल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *