Sunday , November 22 2026
Breaking News

कॅपिटल वनच्या १७ व्या एसएसएलसी व्याख्यानमालेस प्रारंभ

Spread the love

 

बेळगाव : अनसुरकर गल्ली येथील कॅपिटल वन सोसायटीच्या वतीने सलग १७ व्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या एसएसएलसी व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ नुकताच ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन शिवाजीराव हंडे, व्याख्याते एम. व्ही. भोसले व सुनील लाड, संस्थेचे संचालक शरद पाटील व लक्ष्मीकांत जाधव तसेच विद्यार्थिनी स्नेहा हिरोजी उपस्थित होते.

प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर चेअरमन शिवाजीराव हंडे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या वतीने सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या व्याख्यानमालेला मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी मागील वर्षी एसएसएलसी परीक्षेत इंग्रजी विषयात १०० पैकी १०० गुण मिळविल्याबद्दल कु. स्नेहा हिरोजी हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संचालक शरद पाटील यांच्या आभारप्रदर्शनाने उद्घाटन समारंभाची सांगता झाली. त्यानंतर व्याख्यानमालेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेचे कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *