Monday , September 21 2026
Breaking News

सलामवाडीत घरगुती गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप

Spread the love

 

सलामवाडी, ता. हुक्केरी : दड्डी व परिसरातील घराघरांत विराजमान झालेल्या गणपती बाप्पांना भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणेशमूर्ती विसर्जनासाठी सलामवाडी येथील घटप्रभा नदीकाठावर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ढोल-ताशांचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात पारंपरिक पद्धतीने गणरायाचे विसर्जन करण्यात आले.

गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने परिसरातील अनेक ओढे, नाले व पाणवठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांना घटप्रभा नदीकाठाचा आधार घ्यावा लागला. सकाळपासूनच विविध भागांतून गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्ती घेऊन नदीकाठावर दाखल होत होते.

महिला, पुरुष, युवक तसेच लहान मुलांनी उत्साहात विसर्जन सोहळ्यात सहभाग घेतला. महिलांनी गणरायाची आरती करून पूजा-अर्चा केली. नारळ, फुले, फळे व नैवेद्य अर्पण करून भक्तिभावाने बाप्पाला निरोप देण्यात आला. गणरायाला निरोप देताना अनेक भाविकांच्या डोळ्यांत भावुकता दाटून आली.

लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी विसर्जन सोहळ्यात सहभाग घेत गणेशोत्सवाची सांगता केली. यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुख-समृद्धी, समाधान, चांगला पाऊस आणि शेतकऱ्यांना भरघोस पीक मिळावे, अशी प्रार्थना भाविकांनी गणरायाच्या चरणी केली.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *