Monday , September 21 2026
Breaking News

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न: बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता

Spread the love

 

सीमाभागासह महाराष्ट्राचे लक्ष
बेळगाव : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी येत्या बुधवारी (२३ सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणावर तातडीने सुनावणी व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
महाराष्ट्र सरकारने सीमावादाचा दावा ‘मेंशन’ केल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर आले आहे. गेल्या आठवड्यातही या प्रकरणासाठी दोन वेळा तारीख निश्चित करण्यात आली होती; मात्र न्यायालयातील इतर महत्त्वाच्या व तातडीच्या प्रकरणांमुळे दोन्ही वेळा ही सुनावणी पुढे ढकलावी लागली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या २३ सप्टेंबरच्या प्रकाशित कारणसूचीत (Cause List) त्या दिवसाच्या सुनावणीच्या यादीमध्ये या प्रकरणाचा समावेश आहे. मात्र, न्यायालयाच्या प्रत्यक्ष नोंदीची तांत्रिक पडताळणी केल्याशिवाय सुनावणी निश्चित झाली आहे असे ठामपणे सांगता येणार नाही.
गेल्या अनेक दशकांपासून लटकलेल्या या संवेदनशील मुद्द्यावर बुधवारी प्रत्यक्ष सुनावणी होणार का, याकडे संपूर्ण सीमाभागातील मराठी भाषिकांसह महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

About Belgaum Varta

Check Also

इस्कॉनमध्ये राधाष्टमी उत्साहात साजरी

Spread the love  बेळगाव : इस्कॉन चळवळीत श्रीमती राधा राणी यांचा जन्मदिन हा राधाष्टमी उत्सव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *