Friday , November 6 2026
Breaking News

न्यू वृंदावन कॉलनीत १ कोटींच्या विकासकामांना प्रारंभ

Spread the love

 

बेळगाव : शिवतीर्थ कॉलनीतील न्यू वृंदावन कॉलनी येथे बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या हस्ते सुमारे १ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.

या कामांमध्ये सीसी रस्ते, साईड पेव्हर्स तसेच ड्रेनेज गटारींच्या कामांचा समावेश आहे. या विकासकामांमुळे परिसरातील रस्ते संपर्क सुधारण्याबरोबरच नागरिकांची दैनंदिन ये-जा अधिक सुलभ होणार असून, मूलभूत नागरी सुविधांमध्येही सुधारणा होणार आहे.

कार्यक्रमात बोलताना आमदार राजू सेठ यांनी, परिसरातील नागरिकांच्या गरजा व समस्या लक्षात घेऊन विकासकामे हाती घेतली जात असून, कामांचा दर्जा आणि वेळेत अंमलबजावणी यावर विशेष भर दिला जात असल्याचे सांगितले.

स्थानिक नागरिकांनी आमदारांच्या विकासकामांबाबतच्या सक्रिय भूमिकेचे स्वागत करून, नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्याची तत्परता आणि कामांची जलद अंमलबजावणी याबद्दल समाधान व्यक्त केले.

नागरिकांचा प्रतिसाद आणि कृतज्ञता हीच पुढील काळात बेळगाव उत्तर मतदारसंघातील रस्ते, पायाभूत सुविधा आणि नागरी जीवनमान सुधारण्यासाठी काम करण्याची प्रेरणा असल्याचे आमदार राजू सेठ यांनी सांगितले.

यावेळी युवा नेते अमान सेठ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात

Spread the love  बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या ‘संध्या किरण सेवा केंद्रा’च्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *