Monday , September 21 2026
Breaking News

निपाणीतील विश्वकर्मा उद्यानास कोटक एन्शुरन्स पदाधिकाऱ्यांची भेट

Spread the love

 

निपाणी‌ (वार्ता) : स्वकीयाच्या जन्मदिनी वृक्षलागवड करून त्या दिवसाची आठवण कायमस्वरूपी हिरवीगार करण्याचा अनोखा संकल्प पर्यावरणप्रेमी शिक्षक, भूमी वात्सल्य फाउंडेशनचे संस्थापक नामदेवराव चौगुले यांनी केला. त्यातूनच आवटे प्लॉट, लेटेक्स कॉलनीत विश्वकर्मा उद्यानाची निर्मिती करण्यात आली. गेल्यास सव्वीस वर्षापासून सुरू केलेल्या या फर्मास कोटक इन्शुरन्स कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन चौगुले यांच्या कार्याचे कौतुक केले.
सध्या हे उद्यान केवळ झाडांचे ठिकाण राहिले नसून वृक्षसंवर्धन, पर्यावरणप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचे जिवंत प्रतीकबनले आहे.
याप्रेरणादायी विश्वकर्मा उद्यानास राजकुमार लोखंडे, कोटक एन्शुरन्स शाखा प्रमुख कुमार पाटील, वरिष्ठ कोटक, सैनिकरत्न राजेंद्र चौगुले यांनी सदिच्छा भेट दिली. उद्यानाची पाहणी करताना येथील हिरवाई, वृक्षांचे संगोपन आणि पर्यावरण संवर्धनासाठी नामदेवराव चौगुले यांनी घेतलेले अथक परिश्रम पाहून सर्वांनी त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.
सलग २६ वर्षे वृक्ष लागवड करून थांबणे नव्हे, तर रोपांची निगा राखून त्यांना मोठे करण्याची चौगुले यांची भूमिका समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी नामदेव चौगुले यांचा शाल व वृक्षरोप देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय पाहुण्यांचाही वृक्षरोप देऊन सन्मान करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *