Monday , September 21 2026
Breaking News

पिकांसोबत शेतकऱ्यांची स्वप्नेही करपली!

Spread the love

 

निपाणी तालुक्यात पावसाची उघडीप; सोयाबीन, ऊस करपल्याने शेतकरी हवालदिल

निपाणी (वार्ता) : रानात काय राहिलं नाही. पाण्याअभावी समदी पीके करपून गेली. त्यात आमचे स्वप्नही जळून गेले, अशी व्यथा निपाणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आहेत. तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. पावसाचा थेंब नसताना कडक उन्हाचा तडाखा सुरूच असल्याने शेतातील सोयाबीनचे उभे पीक करपून, वाळून गेले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तालुक्यात जवळपास महिनाभर पावसाने दडी मारल्याने
खरीप पिकांना फटका बसला आहे. उत्पन्नाची शाश्वती राहिली नसल्याने शेतकऱ्यांनी पाहिलेली अनेक स्वप्ने आता धुळीस मिळण्याची भीती निर्माण झाली आहे. गतवर्षी अतिवृष्टीने खरीप पिकांचे नुकसान झाले होते. यंदा सोयाबीनचा असून, त्या खालोखाल ऊस व इतर पिकांचे क्षेत्र आहे. सोयाबीनचे पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पाण्याचा खंड पडला. उडीद मुगाच्या उत्पादनात घट झाली आहे.
—————————————————————–

‘आधीच महागाईमुळे बियाणे, खत आणि औषधांवर मोठा खर्च झाला. त्यात पावसाने उघडीप दिल्याने हातातोंडाशी आलेले पीक संकटात सापडली आहेत. आभाळाकडे पाहत दिवस जात आहेत. सरकारने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.
-राजू पोवार, कर्नाटक राज्य रयत संघटना कार्याध्यक्ष, निपाणी.

About Belgaum Varta

Check Also

दसरा महोत्सवातील क्रीडा स्पर्धेत पार्श्वमती विद्यालयाची दैदिप्यमान कामगिरी

Spread the love  निपाणी (वार्ता) : श्री बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित अक्कोळ येथील श्री पार्श्वमती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *