Sunday , September 20 2026
Breaking News

कोट शाळेला पाच संगणकांची देणगी

Spread the love

 

 

ग्रामीण विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी

दड्डी : कोट, ता. हुक्केरी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेला अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, आझादनगर, अंधेरी पश्चिम, मुंबई या कंपनीकडून पाच संगणक देणगी स्वरूपात देण्यात आले. सलामवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन नरसू पाटील यांच्या प्रयत्नातून ही देणगी उपलब्ध झाली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी आणि संगणक शिक्षण अधिक प्रभावीपणे देता यावे, या उद्देशाने मिळालेले हे संगणक शाळेसाठी उपयुक्त ठरणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास मदत होणार असून, त्यांच्या तांत्रिक ज्ञानाला चालना मिळणार आहे.

संगणक उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल गजानन नरसू पाटील तसेच अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संभाजी कोतेकर, शिक्षक दत्तात्रय पाटील, शशिकांत शेलार, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष पुन्नाप्पा प्रधान, उपाध्यक्ष कविता शिंदे, समिती सदस्य तसेच कोट ग्रामपंचायत सदस्य शरद प्रधान, पी.के.पी.एस. सोसायटी अत्तिहाळचे चेअरमन अविनाश पाटील, राजू सुतार उपस्थित होते.

तसेच सलामवाडी येथील युवा कार्यकर्ते दयानंद पाटील, युवराज बराटे, संतोष पाटील आदी उपस्थित होते. ग्रामीण भागातील शाळांना संगणकासारखी आधुनिक शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांना अधिक प्रोत्साहन मिळावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीत श्री हनुमान मंदिराचा वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा उत्साहात

Spread the love  दड्डी : सलामवाडी, ता. हुक्केरी येथे ग्रामस्थ, दानशूर व्यक्ती, भक्तगण तसेच मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *