Monday , September 21 2026
Breaking News

सरपंच चषक फौंडेशनचा मानकरी भावेश्वरी-११ सलामवाडी

Spread the love

 

 

टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भावेश्वरी स्पोर्ट्स हेब्बाळ द्वितीय; मोरया स्पोर्ट्स दड्डी तृतीय

दड्डी : मोदगे (ता. हुक्केरी) येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भावेश्वरी-११ सलामवाडी संघाने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान झालेल्या या स्पर्धेला क्रिकेटप्रेमी तसेच परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्पर्धेच्या अंतिम निकालात भावेश्वरी-११ सलामवाडी संघाने प्रथम क्रमांक मिळवत ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक पटकावले. भावेश्वरी स्पोर्ट्स हेब्बाळ संघाने द्वितीय क्रमांक मिळवत ७ हजार ७७७ रुपये, मोरया स्पोर्ट्स दड्डी संघाने तृतीय क्रमांक मिळवत ५ हजार ५५५ रुपये, तर क्रांतीवीर हेब्बाळ संघाने चतुर्थ क्रमांक मिळवत ३ हजार ३३३ रुपयांचे पारितोषिक मिळवले.

स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासह विविध वैयक्तिक व विशेष पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तीन दिवस रंगलेल्या या स्पर्धेमुळे मोदगे परिसरात क्रिकेटचा उत्साह पाहायला मिळाला.

भावेश्वरी स्पोर्ट्स सलामवाडी संघातील खेळाडू : अंकुश दावणे, अमृत दावणे, ओंकार गोंधळी, सौरभ सुतार, सचिन सुतार, संदीप पाटील, सुदर्शन पाटील, अवधूत व्होडगे, तुषार पाटील, महेश सावंत, बबलू बराटे, रवीकुमार सुतार, निशांत पाटील, रूपेश पाटील, तेजस पाटील, विजय रा. पाटील आणि आनंद अस्वले.

स्पर्धेच्या आयोजनासाठी विविध मान्यवर, ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी तसेच विविध ग्रामस्थ मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. अंतिम सामन्यानंतर विजेता व उपविजेता संघ तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

Spread the love  बुद्धिबळ व योगासन स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर निवड मणगुती : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *