Monday , September 21 2026
Breaking News

‘आयवामा’च्या अध्यक्षपदी विनायक लोकूर

Spread the love

 

बेळगाव : इंडियन व्हॉल्व्ह अँड अॅक्च्युएटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (आयवामा) अध्यक्षपदी एक्स्पर्ट व्हॉल्व्हजचे व्यवस्थापकीय संचालक विनायक लोकूर यांची निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर ही निवड करण्यात आली. यावेळी लोकूर यांनी नवोन्मेषाला प्रोत्साहन देणे, सहकार्य अधिक मजबूत करणे आणि शाश्वत पद्धतींना चालना देण्यावर भर दिला. राष्ट्रीय तसेच जागतिक प्रगतीमध्ये उद्योगाचे योगदान अधिक प्रभावी करण्यासाठी आयवामा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. उत्पादक आणि उद्योगाशी संबंधित सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करून उत्कृष्टतेचे नवे मापदंड निश्चित करावेत, या उद्देशाने संघटनेची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ उद्योग संघटना म्हणून मर्यादित न राहता परिवर्तनासाठी प्रभावी व्यासपीठ म्हणून कार्य करण्याचा आयवामाचा मानस आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री एकदंत युवक मंडळाच्या मंडपासमोर रंगली मंगळागौर

Spread the love  महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; पारंपरिक खेळांनी परिसरात उत्साह बेळगाव : एसटीएम समर्थनगर येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *