








बेळगाव : उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी चव्हाट गल्ली येथील ‘बेळगावचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रीमंडपाला सदिच्छा भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले.
यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संदीप पाटील यांचे स्वागत करून सत्कार केला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्सवातील सुरक्षा व्यवस्था, शांतता आणि नियोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
गणेशोत्सव काळात नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, तसेच उत्सव उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन व मंडळांनी समन्वय ठेवण्याबाबतही चर्चा झाली.
यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गणेशभक्त उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta