Monday , September 21 2026
Breaking News

राम मंदिरातील देणगी चोरीच्या १०५ घटना सिसिटीव्हीमध्ये कैद; २५ सप्टेंबरला आरोपपत्र

Spread the love

 

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासात देणगी चोरीच्या १०५ घटना सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समोर आले आहे. विशेष तपास पथकाने (SIT) केलेल्या तपासाची माहिती सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, एसआयटीचा तपास अंतिम टप्प्यात असून २५ सप्टेंबर रोजी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. तपासादरम्यान सिसिटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि अन्य पुरावे गोळा करण्यात आले आहेत.

एसआयटीच्या अहवालानुसार, सिसिटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे संशयितांची ओळख पटविण्यात आली. मौल्यवान वस्तूंच्या पोहोचपावत्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तयार करण्यात आल्या असून, संबंधित वस्तू स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्याची माहितीही न्यायालयात देण्यात आली.

याचिकाकर्त्यांनी एसआयटीच्या अहवालाची प्रत देण्याची मागणी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळली. तसेच हे प्रकरण सत्र न्यायालयाकडून काढून घेण्याचा सध्या कोणताही विचार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

या प्रकरणात दाखल एफआयआरमध्ये आठ संशयितांची नावे असून, सर्व आठ जणांना अटक करण्यात आली आहे. ट्रस्टच्या विनंतीनंतर राज्य सरकारने १३ जून रोजी लखनऊचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय एसआयटी स्थापन केली होती. या पथकाने २३ जून रोजी प्राथमिक अहवाल सरकारला सादर केला होता.

दरम्यान, कथित देणगी गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्टच्या प्रशासनात बदल करण्यात आल्याची माहितीही न्यायालयास देण्यात आली. माजी लष्करी अधिकारी जितेंद्र मिश्रा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारची धडक; आठ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

Spread the love    त्रिशूर : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारने पाठीमागून जोरदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *