Friday , October 23 2026
Breaking News

नूडल्स खाल्ल्याने पाच जणांचा मृत्यू? प्रकरणाला नवे वळण; मृत्यूपूर्वीच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमधून महत्त्वाचा खुलासा

Spread the love

 

 

ग्रेटर नोएडा : एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यू प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. मृत्यूपूर्वी कुटुंबप्रमुखाने मोबाईलमध्ये केलेल्या व्हॉइस रेकॉर्डिंगमधून या प्रकरणातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या दोन बहिणी आणि मेहुण्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

ग्रेटर नोएडातील रबूपुरा येथील नागला श्री पदम गावात महेश (वय ३७) हा पत्नी आणि तीन मुलांसह घरात मृतावस्थेत आढळला होता. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. सुरुवातीला घटनेच्या आदल्या रात्री कुटुंबाने नूडल्स खाल्ले असल्याने अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

मात्र, मृत्यूपूर्वी महेशने मोबाईलमध्ये केलेल्या व्हॉइस रेकॉर्डिंगमुळे तपासाला नवी दिशा मिळाली आहे. या रेकॉर्डिंगमध्ये त्याने आपल्या मृत्यूला दोन बहिणी आणि मेहुणा जबाबदार असल्याचे म्हटल्याची माहिती समोर आली आहे. मालमत्तेच्या वादातून बहिणींसोबत वारंवार भांडणे होत असल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, शवविच्छेदन अहवालात विषप्राशनाची शक्यता दर्शवणारी लक्षणे आढळल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांचे अवयव जतन करून ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

मृत महेशच्या मेहुण्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. व्हॉइस रेकॉर्डिंग, मालमत्तेचा वाद आणि न्यायवैद्यक अहवालाच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलिस तपास आणि न्यायवैद्यक अहवालानंतरच या पाचही मृत्यूंचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

बिहारमध्ये गंगा नदीत बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

Spread the love  वैशाली (बिहार) : बिहारमधील वैशाली जिल्ह्यात गंगा नदीत बोट उलटून झालेल्या भीषण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *