Friday , October 23 2026
Breaking News

सीबीएसईचा अभ्यास झाला सोपा; ज्योती सेंट्रल स्कूलच्या उपक्रमांचे पालकांकडून कौतुक

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची विशेष सभा उत्साहात पार पडली. सीबीएसई अभ्यासक्रम सोप्या आणि प्रभावी पद्धतीने शिकविण्यासाठी शाळेत राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे पालकांनी कौतुक केले.

सभेची सुरुवात पालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी शाळेचे प्राचार्य प्रदीप पाटील यांनी पालक आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करता येईल, याबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

प्राचार्य पाटील म्हणाले की, आधुनिक काळात विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर करावा लागतो. मात्र, त्याच्या वापरावर योग्य नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मोबाईल टीव्हीला जोडून अभ्यासाचे साहित्य मोठ्या पडद्यावर दाखविल्यास विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासावर केंद्रित होण्यास मदत होऊ शकते. या पद्धतीमुळे अभ्यास अधिक प्रभावी आणि समजण्यास सोपा होईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित पालकांनी शाळेतील शैक्षणिक उपक्रमांविषयी समाधान व्यक्त केले. नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींमुळे सीबीएसई अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना सहज समजत असून, प्राचार्यांचे अनुभवी आणि विचारपूर्वक मार्गदर्शन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिशादर्शक ठरत असल्याचे पालकांनी नमूद केले.

या सभेला प्राचार्य प्रदीप पाटील, उपप्राचार्य मनोहर करडी, इयत्ता दहावीचे सर्व शिक्षक आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *