Friday , October 23 2026
Breaking News

आकाशदीप आर. के. नेत्रालयाचे अत्याधुनिक नेत्ररुग्णालय बेळगावात सुरू

Spread the love

 

 

निओ लेसर तंत्रज्ञानासह विविध नेत्रोपचार सुविधा उपलब्ध; १९८२ पासूनच्या सेवेचा नवा टप्पा

बेळगाव : गेल्या ४५ वर्षांहून अधिक काळ नेत्रसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आकाशदीप आर. के. नेत्रालयाच्या अत्याधुनिक नेत्ररुग्णालयाचे उद्घाटन रविवारी हरी मंदिर रोड येथे झाले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी डॉ. कुणाल पाटील यांनी आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, तज्ज्ञ नेत्रसेवा आणि सर्वसमावेशक उपचार सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे नवीन केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
डॉ. पाटील यांनी आकाशदीप नेत्रालयाची सुरुवात १९८२ मध्ये झाली. महाराष्ट्रातील सांगली-मिरज, कोल्हापूर, सोलापूर व अथणी नेत्रसेवा देणाऱ्या या संस्थेने आता बेळगाव येथे विस्तार केला आहे. या केंद्रामुळे बेळगाव शहरासह उत्तर कर्नाटकातील नागरिकांना प्रगत नेत्रोपचारांसाठी स्थानिक पातळीवर सुविधा मिळणार आहेत. या रुग्णालयाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे स्वित्झर्लंडच्या झीमर कंपनीचे निओ फेम्टोसेकंद लेसर तंत्रज्ञान. मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि निवडक रिफ्रॅक्टिव्ह प्रक्रियांमध्ये या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. याशिवाय, चष्म्यावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आधुनिक दृष्टी सुधारणा प्रक्रियांचे पर्यायही उपलब्ध असतील. रुग्णाच्या डोळ्यांची स्थिती आणि वैद्यकीय तपासण्यांनुसार उपचार केले जाणार आहेत.
रुग्णालयात मोतीबिंदू, रेटिनाचे विकार, मधुमेहजन्य नेत्रविकार, काचबिंदू, कॉर्नियाचे आजार, ओक्युलोप्लास्टी, बालनेत्ररोग आणि तिरळेपणा यांसारख्या विविध समस्यांसाठी उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार लेसर उपचार, इंट्राव्हिट्रियल इंजेक्शन्स आणि शस्त्रक्रियांसाठीही मार्गदर्शन मिळणार आहे.
पात्र रुग्णांसाठी विमा कंपन्या, थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटर्स आणि लागू शासकीय आरोग्य योजनांअंतर्गत नियमानुसार कॅशलेस उपचारांची सुविधाही उपलब्ध असून तुमची दृष्टी, आमचे प्राधान्य हे ब्रीदवाक्य जपत आधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि रुग्णकेंद्रित सेवा यांच्या माध्यमातून बेळगाव व उत्तर कर्नाटकातील नागरिकांना दर्जेदार नेत्रोपचार उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे अशी माहिती दिली.
पत्रकार परिषदेल डॉ उदय पाटील डॉ स्नेहा भांदुर्गे, डॉ आनंद भांदुर्गे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *