Sunday , September 20 2026
Breaking News

लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

Spread the love

 

बुद्धिबळ व योगासन स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर निवड

मणगुती : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित लालबहादूर शास्त्री विद्यालय, मणगुती येथील विद्यार्थ्यांनी हुक्केरी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. या यशामुळे विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ व योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी सरकारी माध्यमिक शाळा, नेरली (ता. हुक्केरी) येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेसह मणगुती परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. के. स्वामी तसेच शिक्षक एस. के. मेंडुले, के. एम. राऊत आणि इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून आगामी स्पर्धेतही उत्तम कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीत श्री हनुमान मंदिराचा वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा उत्साहात

Spread the love  दड्डी : सलामवाडी, ता. हुक्केरी येथे ग्रामस्थ, दानशूर व्यक्ती, भक्तगण तसेच मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *