मणगुत्ती : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, लालबहादूर शास्त्री विद्यालय मणगुत्ती, तालुका हुक्केरी येथे झालेल्या तालुकास्तरीय योगा स्पर्धेत लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला या संघाची चिकोडी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या संघामध्ये पुढील विद्यार्थिनींचा सहभाग आहे. कुमारी सुषमा पाटील, दिया धनाजी, दिव्या पाटील, गौतमी पाटील …
Read More »सलामवाडी सरकारी मराठी शाळेला माजी विद्यार्थ्यांकडून फ्रिज भेट!
दड्डी : सलामवाडी ता हुक्केरी येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त 1992- 93 बॅचच्या इयत्ता 7वीच्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या भोजन सामग्रीची अडचण ओळखून दूर करण्यासाठी पुढाकार घेऊन सरकारी मराठी मुलांची शाळा सलामवाडी या शाळेला फ्रीज सप्रेम भेट देण्यात आली. तसेंच गावातील घटप्रभा हायस्कूल सलामवाडी येते वीस लिटरचे कुकर दिले …
Read More »ग्रामपंचायत सदस्याचा अनैतिक संबंधातून निर्घृण खून; शरीराचे तुकडे हिरण्यकेशी नदीत फेकले!
कोल्हापूर : कोल्हापुर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावाच्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्याचा निर्घृण खून करून मृतदेह संकेश्वरजवळ हिरण्यकेशी नदीत फेकून देण्यात आले. लखन बेनाडे असे ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. मागील आठ दिवसांपासून बेनाडे हे बेपत्ता होते, बेनाडे यांच्या शरीराचे दोन तुकडे करून मृतदेह कर्नाटकमधील हिरण्यकेशी नदीत …
Read More »लग्न न झाल्याच्या निराशेमुळे दोन भावांनी केली आत्महत्या!
संकेश्वर : जीवनाला कंटाळून दोन भावांनी आत्महत्या केल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील कोननकेरी गावात ही दुर्घटना घडली. लग्न न झाल्याच्या निराशेमुळे दोन्ही भावांनी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्यााचे समजतते. संतोष रवींद्र गुंडे (५५) आणि अण्णासाहेब रवींद्र गुंडे (५०) हे मृत भाऊ आहेत. लग्न न झाल्याने दोन्ही भावांना दारूचे व्यसन …
Read More »मनगुती येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
दड्डी : मनगुती ता. हुक्केरी येथील प्राथमिक मराठी शाळा मनगुती व दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित लाल बहादूर शास्त्री विद्यालय मनगुती येथे ई. 2001-2002.. मध्ये इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. तब्बल 25 वर्षांनी या कार्यक्रमाचे नियोजन झाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास …
Read More »संकेश्वरात उत्साहात स्वामी समर्थ प्रकटदिन!
संकेश्वर : संकेश्वर येथील दत्त पंत मंदिर श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने स्वामी समर्थ प्रकट दिन दूरदुंडेश्वर भवनात साजरा झाला. सकाळी स्वामींच्या प्रतिमेचे पूजन व भूपाळी झाली. दरम्यान सारामृत पारायणाची पोथी २०० हून अधिक सेविकाऱ्यांनी वाचन केले. यावेळी नारायण फलसे, संतोष मगदूम यांच्याहस्ते महाआरती झाली. शंकराचार्य मठाचे सच्चिदानंद अभिनव …
Read More »संकेश्वरात तुळजाभवानी मूर्तीची उद्या प्रतिष्ठापना!
संकेश्वर : गोंधळी समाजातर्फे सुभाष रोड कमतनुर वेस नजीक लोकवर्गणीतून उभारण्यात आलेले तुळजाभवानी मंदिराची वास्तुशांती मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा ता. २ मार्च ते ६ मार्च अखेर होणार आहे. हुक्केरी तालुक्यात हे एकमेव तुळजाभवानीचे मंदिर उभारले असून लोकापूर (बागलकोट) येथील मूर्तिकार शिवानंद बडगेर यांनी “३९” इंच उंचीची देवीची मूर्ती …
Read More »निडसोशी गेटसमोरील बेकरी शॉर्टसर्किटमुळे जळून खाक
संकेश्वर : जवळच असलेल्या निडसोशी गेटसमोरील बेकरी शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना आज दुपारी घडली. मंड्या येथील उमेश नावाच्या व्यक्तीच्या बेकरीमध्ये दुपारी जेवण बनवताना शॉर्टसर्किट होऊन बेकरीमध्ये तयार केलेली मशिनरी व विविध फराळाचे साहित्य जळून खाक झाले असून 10 लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच मालक …
Read More »हुक्केरी येथे १९ रोजी अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण
हुक्केरी : शहरातील बेळगाव रोडवर असणाऱ्या हळदकेरी भागात येथे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण दि. १९ फेब्रुवारी होणार असून हुक्केरी शहरात वातावरण शिवमय झाले आहे. या पार्श्वभूमीवर १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे. शहरातील शिवप्रेमी नागरिकांनी या कामी विशेष परिश्रम घेतले आहे. …
Read More »हिरा शुगर अध्यक्षपदी बसवराज कल्लटी तर उपाध्यक्षपदी अशोक पट्टणशेट्टी यांची निवड
संकेश्वर : बहुचर्चित ठरलेल्या हिरा शुगरच्या नूतन अध्यक्षपदी बसवराज कल्लटी तर उपाध्यक्षपदी अशोक पट्टणशेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गत दिवसांपूर्वी हिरा शुगरचे चेअरमन व आमदार निखिल कत्ती यांनी आमदार असल्याने लोक संपर्क ठेवण्यात अडचणीत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आज त्या रिक्त जागी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta