Sunday , July 26 2026
Breaking News

मोदगे येथे सर्पमित्राने दिले सापाचा जीवदान

Spread the love

 

दड्डी : मोदगे येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये साप आढळल्याने काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सर्पमित्र धनंजय पाटील यांच्या तत्परतेमुळे सापाला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडून जंगल परिसरात सोडण्यात आले.

मोदगे येथील आन्नाप्पा पाटील यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये काम सुरू असताना अचानक साप दिसून आला. साप पाहताच कामगार व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. याबाबत तात्काळ धोंडगट्टे येथील सर्पमित्र धनंजय पाटील यांना माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच धनंजय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अत्यंत कौशल्याने आणि कोणतीही इजा न करता सापाला पकडले. त्यानंतर सापाची ओळख पटवून तो विषारी नसल्याची खात्री केली आणि सुरक्षितरीत्या जंगल परिसरात सोडून दिले.

यावेळी धनंजय पाटील यांनी नागरिकांना साप दिसल्यास घाबरून जाऊ नये किंवा सापाला मारण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले. अशा वेळी त्वरित सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले. साप हे पर्यावरणातील अन्नसाखळीतील महत्त्वाचे घटक असून उंदीर व इतर हानिकारक कीटकांवर नियंत्रण ठेवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान

Spread the love  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *