Sunday , July 26 2026
Breaking News

सराफ कॉलनीतील विहिरींमध्ये ड्रेनेजचे पाणी झिरपले; नागरिकांमध्ये संताप

Spread the love

 

बेळगाव : अजंटा हॉटेलच्या पाठीमागील सराफ कॉलनी परिसरात ड्रेनेजच्या गळतीमुळे सहा उघड्या विहिरी आणि एका बोअरवेलमधील पाणी दूषित झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील काही ड्रेनेज मॅनहोलमधून सांडपाण्याची गळती होत असल्याने हे दूषित पाणी भूगर्भात झिरपून विहिरी व बोअरवेलमध्ये मिसळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परिणामी, नागरिकांच्या वापरातील पाणी प्रदूषित झाले असून आरोग्यविषयक धोका निर्माण झाला आहे.

स्थानिक रहिवाशांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत महापालिका प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करावी, गळती होणाऱ्या ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करावी आणि दूषित पाण्याची तपासणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

तसेच विहिरी व बोअरवेलमधील पाण्याची गुणवत्ता तपासून नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून समस्या निकाली काढावी, अन्यथा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *