Sunday , September 20 2026
Breaking News

सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान

Spread the love

 

दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त बुधवारी (दि. २२ जुलै) मोठ्या भक्तिभावाने प्रस्थान झाले. विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या दिंडीमुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

प्रस्थानापूर्वी वाहनाचे विधिवत पूजन तानाजी कळवीकट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” आणि “ज्ञानोबा-तुकाराम” यांच्या जयघोषात दिंडीने पंढरपूरकडे मार्गक्रमण केले. गावातील नागरिकांनी भाविकांना शुभेच्छा देत निरोप दिला.

यंदा सलामवाडी येथून एकूण 40 भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. या दिंडीत जनार्धन पाटील, मनोहर सावंत, शांताराम पाटील, बाबू पाटील, मारुती अस्वले, नारायण सुतार, नवदीप सुतार, कृष्णा पाटील, लीला पाटील, सुंदराबाई पाटील, शेवंता पाटील, आक्काताई पाटील, विमल पाटील, गंगुबाई मांग, समिता पाटील, दशरथ गोंधळी, अर्जुन पाटील, सुरेश देसाई यांच्यासह इतर भाविकांचा सहभाग आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सलामवाडीतील भाविक मोठ्या श्रद्धेने पंढरपूर वारीत सहभागी झाले असून, श्री विठ्ठलाच्या दर्शनाने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी व आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना भाविकांनी व्यक्त केली. गावकऱ्यांनी दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत भाविकांना मंगलमय यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *