Sunday , September 20 2026
Breaking News

तब्बल 30 वर्षानंतर शाळेच्या उंबरठ्यावर….

Spread the love

 

उत्तूर : जी मुले हाफ खाकी चड्डी आणि सफेद रंगाचे शर्ट, डोक्यावर गांधी टोपी आणि मुली पलकर झंपर आणि दोन वेण्या घालून शाळेत जायची. त्यांनी तीन दशकानंतर भरवला स्नेहमेळावा. पुन्हा शाळा घंटा वाजली आणि वर्ग भरला उत्सुकतेने आनंदाने आणि शिक्षकांच्यासह सारेच गहिवरले…..
उत्तूर विद्यालय, उत्तूर शाळेच्या 1995-96 बॅचच्या मुला-मुलींनी 30 वर्षानंतर पुन्हा एकत्र येऊन आपल्या लाडक्या शिक्षकांच्यासह पुन्हा शाळा भरवली.
या कार्यक्रमाला उपस्थित विद्यमान मुख्याध्यापक श्री. महापुरे सर यांच्यासह निवृत्त शिक्षक शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते. त्यामध्ये श्रीमती पाटील मॅडम, श्रीमती दीक्षित मॅडम, देऊसकर मॅडम, श्री. टि. के.पाटील सर, ढोनणूक्षे सर,.आमाणगी सर, चिंचनेकर सर, धुरे सर, शिवणे स, पानारी सर, शाळेचे निवृत्त शिपाई गुरव मामा, नंदू मामा, यल्लापा मामा यांच्यासह 86 विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात गुरुव मामांच्या शुभहस्ते शाळेचे संस्थापक कै. अनंतराव आजगावकर सर आणि शाळेचे आधारस्तंभ कै. देशमाने डॉक्टर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. सर्व शिक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सर्वांचे विद्यार्थ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, एक आठवण म्हणून भेटवस्तू देऊन सन्मान करणेत आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक विद्यार्थी संग्राम आपके यांनी केले आणि प्रा. डॉ. बाळगोंडा पाटील सर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. शैलेश ढबू, नंदा पाटील, संदीप काटे, सुधीर सावेकर, सुहास शेवाळे, कुबेर मोरे, संदीप भिउंगडे, युवराज नाईक या स्थानिक वर्गमित्रानी सर्वांच्या सहकाऱ्याने केले.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *