Sunday , September 20 2026
Breaking News

पावसाच्या अंदाजासाठी मदार विज्ञानावर, शेतकऱ्यांचा विश्वास आधुनिक साधनांवर

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी पूर्वी ग्रामीण भागातील शेतकरी पावसाचा अंदाज निसर्गाच्या बदलावरून अचूक बांधत होते. पक्ष्यांचे आवाज वाऱ्याची दिशा, झाडाच्या शेड्यांवर बांधली जाणारी कावळ्यांची घरटी हे पावसाचे महत्त्वाचे संकेत मानले जात. बदलते वातावरण, वृक्षतोड, वाढते शहरीकरण आणि मानवी हस्तक्षेपामुळे हे नैसर्गिक संकेत हळूहळू दुर्मीळ होत आहेत. शेतकऱ्यांची मदार आता आधुनिक हवामान विभागाच्या अंदाजावर दृढ होत चालली आहे.
पावसाळा सुरू होण्याच्या साधारण महिनाभर आधी कावळे घरटी बांधण्यास सुरुवात करत. यात वाऱ्याची दिशा, बांधण्याची पद्धत आणि काड्यांची रचना पाहून अनुभवी शेतकरी पावसाचे अंदाज बांधत होते. पक्ष्यांच्या आवाजावरूनही हवामानाचा अंदाज बांधला जात होता. पावसाच्या आधी काही पक्ष्यांचा वाढलेला किलबिलाट, कावळ्यांचे विशेष आवाज किंवा वातावरणातील बदल वावरून पाऊस येणार, याचे अंदाज वर्तविले जात होते.
हवामानातील बदल आणि पर्यावरणीय असमतोलामुळे हे नैसर्गिक पावशासह अन्य असे पक्ष्यांचे आवाज आता ऐकण्यास मिळत नाहीत. हवामानातील बदल आणि पर्यावरणीय असमतोलामुळे हे नैसर्गिक संकेत कमी होत चाललेत. सध्या हवामान विभाग उपग्रह मोबाईल ऍप आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पावसाचा अंदाज जाहीर करत असल्याने शेतकरी त्यावर अधिक विश्वास ठेवत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *