Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव तालुक्यात चोरट्यांचा हैदोस; बिजगर्णीत भरदिवसा घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास!

Spread the love

 

ग्रामीण भागात भीतीचे सावट, पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह

बेळगाव : बेळगाव तालुक्यात चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. सोनोली येथे वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून सुमारे १२ लाखांचा ऐवज लुटल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी बिजगर्णी येथे भरदिवसा घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आला. अवघ्या काही दिवसांच्या अंतराने घडलेल्या या दुसऱ्या मोठ्या चोरीमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांच्या गस्तीच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हनुमाननगर (बिजगर्णी) येथील जोतिबा रामा मोरे हे आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घरावर पाळत ठेवली. शुक्रवारी दुपारी घरात कोणी नसल्याची खात्री करून कडी-कोयंडा तोडत घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील साडेतीन तोळे सोन्याचे दागिने, पावणेदोन लाखांची रोख रक्कम आणि चांदीचे दागिने असा लाखोंचा ऐवज हातोहात लंपास केला.

घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, तालुक्यात वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

सोनोली, बिजगर्णीसह तालुक्यातील विविध गावांमध्ये वाढत्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, रात्रीबरोबरच दिवसाही गस्त वाढवावी आणि ग्रामीण भागात विशेष पोलिस मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *