Monday , September 21 2026
Breaking News

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love

 


बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या चौघांच्या टोळीचा हुकेरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गांजाच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत एका व्यक्तीकडून ६० हजार उकळल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे कल्लप्पा माळज, मल्लिकार्जुन जुल्फी, पृथ्वीराज चौहान आणि डेव्हिड तंगेराळ अशी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटबागी येथील मेहबूब यांना जबरदस्तीने गांजा देण्यात आला. त्यानंतर आरोपींनी स्वतःला पोलीस व पत्रकार असल्याचे सांगत त्यांचे फोटो आणि व्हिडिओ चित्रित केले. “गांजाच्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात पाठवू,” अशी धमकी देत सुरुवातीला २ ते ३ लाखांची मागणी करण्यात आली. अखेरीस तडजोडीअंती पीडिताकडून ६० हजारांची खंडणी उकळण्यात आली.
यावरच न थांबता आरोपींनी संबंधित व्हिडिओ ‘जीडी टीव्ही’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित करून पीडितावर आणखी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी हुक्केरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन (आयपीएस) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सीपीआय एस. आर. गणाचारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बेळगाव येथे छापा टाकून चौघांना अटक केली.
आरोपींकडून एक मारुती एर्टिगा कार, एक दुचाकी, दोन मोबाईल फोन आणि ३४ हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास हुक्केरी पोलीस करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *