Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love

 

 

गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त

बेळगाव : बेळगाव शहरातील केंद्रीय गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पथकाने मोठी कारवाई करत खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गांजासह अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे ₹८० हजार किमतीचा गांजा आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जयनगर येथील आकाश दिलीप दोडमनी याला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने २४ जुलै रोजी एका साथीदाराच्या मदतीने गोव्यातून गांजा आणून जांबोटी मार्गे बेळगावमध्ये विक्री करण्याचा प्रयत्न केला होता. याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सीसीबीने सापळा रचून ही कारवाई केली.

कारवाईदरम्यान आरोपीकडून १ किलो ७०४ ग्रॅम गांजा (अंदाजे किंमत ₹८० हजार) तसेच ₹११ हजार किमतीचे दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

तपासात आकाश दोडमनी हा बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या खून आणि ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात फरार असल्याचे उघड झाले. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सीसीबी पोलीस करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *