Sunday , July 26 2026
Breaking News

द्रोण संघ डी. व्ही. पाटील स्मृती चषकाचा मानकरी

Spread the love

 

कुरली संघाने पटकवले उपविजेतेपद ; क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील दिवंगत माजी नगराध्यक्ष डी. व्ही. पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हिंदवी स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित पाचव्या पर्वातील डी. व्ही. पाटील स्मृती चषकावर निपाणीतील द्रोण संघाने आपले नाव कोरले. या संघाला रोख ५१ हजार रुपये आणि चषक देण्यात आले.
अर्जुननगर येथील एम. डी. विद्यालय मैदानावर या स्पर्धा पार पडल्या. गुरुवारी (ता.२८) पाचगाव परमणे टेडर्स आणि निपाणीतील द्रोण स्पोर्ट्स यांच्यात उपांत्य सामना झाला. तुळशीच्या या सामन्यात द्रोण स्पोर्ट्ने विजय मिळवला. त्यानंतर कुरली स्पोर्ट्स क्लब विरुद्ध कोगनोळी स्पोर्ट्स क्लब यांच्यात दुसरा उपांत्य सामना झाला. त्यामध्ये कुरली संघाने एकतर्फी विजय मिळविला.
सायंकाळी द्रोण स्पोर्ट्स आणि कुरली स्पोर्ट्स संघात अंतिम सामना पार पडला. त्यामध्ये द्रोण संघाने विजय मिळवला.
विजेत्या दुसऱ्या क्रमांकाच्या कुरली संघाला रोख २५ हजार रुपये आणि चषक तर तृतीय क्रमांक पटकावलेल्या पाचगाव परमने ट्रेडर्स संघाला रोख ७ हजार‌ ५०० रुपयांचे बक्षीस देण्यात आले. या शिवायमॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल, बेस्ट बॅट्समन व बेस्ट बॉलरसाठी विशेष ट्रॉफी देऊन सागर कमते श्रेयस मातीवडर, गणेश कांबळे कडगाव, रोहित खांडेकर शुभम नागेश या
खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. डी. डी. हळवणकर यांनी स्पर्धेचे समालोचन केले.
यावेळीटाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, ॲड. अशोक शिंदे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, पंकज पाटील, सुजय पाटील, सुप्रिया पाटील, रोहन कोठीवाले, किरण कोकरे, किरण पाटोळे, विजय शेटके, रवींद्र श्रीखंडे, अरुण आवळेकर, सागर पाटील, नितीन उपाळे, स्वप्निल पावले, रणजीत मगदूम, विनोद बल्लारी, कृष्णा कुंभार, सचिन काटकर, सुरेश घाटगे, रमेश भोईटे, पुंडलिक कुंभार यांच्यासह क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *