Sunday , September 20 2026
Breaking News

टाळ-मृदुंगाच्या गजरात मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

Spread the love

 

चिमुकल्यांच्या दिंडी, संतांच्या वेशभूषा, भजन-कीर्तन व सामूहिक नृत्याने रंगला भक्तिमय सोहळा

बेळगाव : टाळ-मृदुंगाच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेतील चिमुकल्यांची दिंडी आणि भजन-कीर्तनाच्या सुरांनी मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जणू संतांची मांदियाळीच अवतरल्याचा अनुभव उपस्थितांना आला. आषाढी एकादशीचा सोहळा शाळेत अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत जनाबाई तसेच पांडुरंग यांसह विविध संतांच्या पारंपरिक वेशभूषा परिधान करून वारकरी परंपरेचे दर्शन घडविले. टाळ-मृदुंगाच्या गजरात पारंपरिक अभंग, भजन-कीर्तन, सामूहिक नृत्य आणि चिमुकल्यांच्या दिंडीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आषाढी एकादशीचा सोहळा अधिकच रंगतदार ठरला.

शाळेच्या प्राचार्या डॉ. सुचेता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेचे चेअरमन अविनाश पोतदार, सेक्रेटरी एस. शिवणगी, उपसेक्रेटरी अरविंद होनगूळ, सीआरपी कुंभार सर, बीआरसीचे येळूरकर सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत वारकरी संस्कृतीचे जतन करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *