Sunday , September 20 2026
Breaking News

आषाढी एकादशी निमित्त शिवसेना व आर्यन फाउंडेशनच्या वतीने विठ्ठल-रखुमाई महापूजा

Spread the love

बेळगाव : आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर बेळगाव जिल्हा शिवसेना व आर्यन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने खडेबाजार येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात विशेष महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना जिल्हाप्रमुख हणमंत मजुकर यांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न झाली.

यावेळी उत्तम पिकपाण्यासहीत शेतकरी आणि सर्व जनतेच्या सुखसमृद्धीसाठी विठ्ठलचरणी साकडे घालण्यात आले. तसेच उपस्थित भाविकांसाठी फळवाटप करण्यात आले.

या प्रसंगी परशराम गोंडकर, कुशल मजुकर, सदानंद सदाकाळे, रमेश पाटील, विनायक कुडेकर, प्रशांत खन्नुकर, आर्यन मजुकर, प्रिया मजुकर यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिक, आर्यन फाउंडेशनचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *