Sunday , September 20 2026
Breaking News

अमरावतीत आंबोली पब्लिक स्कूलच्या एनसीसी कॅडेट्सची सुवर्ण कामगिरी; राष्ट्रीय थल सैनिक शिबिरासाठी निवड

Spread the love

 

रायफल शूटिंगमध्ये सार्जंट श्रीपाद तार्लेकर यांना सुवर्णपदक; CQMS राज बागवे यांचीही राष्ट्रीय स्तरासाठी निवड

आंबोली : आंबोली पब्लिक स्कूल, आंबोली येथील 58 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, सिंधुदुर्गच्या दोन कॅडेट्सनी अमरावती येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य संचालनालयस्तरीय थल सैनिक शिबिर (TSC-2026) अंतर्गत आयोजित रायफल शूटिंग स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेसह सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे.

या स्पर्धेत कॅडेट सार्जंट श्रीपाद शरद तार्लेकर यांनी अचूक नेमबाजीचे उत्कृष्ट कौशल्य प्रदर्शित करत सुवर्णपदकावर नाव कोरले. सातत्यपूर्ण सराव, जिद्द, चिकाटी आणि प्रशिक्षकांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे त्यांनी हे यश मिळविले.

याच स्पर्धेत CQMS राज रमेश बागवे यांनीही उत्कृष्ट कामगिरी करत आपले नेमबाजी कौशल्य सिद्ध केले. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर सार्जंट श्रीपाद तार्लेकर आणि CQMS राज बागवे या दोन्ही कॅडेट्सची आगामी राष्ट्रीय थल सैनिक शिबिर (TSC) साठी निवड झाली आहे. ही निवड आंबोली पब्लिक स्कूल तसेच 58 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, सिंधुदुर्गसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

या यशामागे 58 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजयराज, अॅडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक, एनबी सुभेदार विनोद सिंह, एचव्ही जयमल तसेच सर्व जेसीओ आणि पीआय स्टाफ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शालेय स्तरावर सीटीओ शैलेंद्र सावंत आणि एनसीसी प्रशिक्षक निखिल तेली यांनी विद्यार्थ्यांना दिलेले सातत्यपूर्ण प्रशिक्षण, शिस्त आणि प्रेरणेमुळे हे यश शक्य झाले.

तसेच शाळेचे प्राचार्य विलास मोरे यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधा, प्रोत्साहन आणि सातत्यपूर्ण पाठबळामुळे या यशाला अधिक बळ मिळाले.

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल दोन्ही कॅडेट्सचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे आंबोली पब्लिक स्कूल आणि 58 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, सिंधुदुर्ग यांच्या नावलौकिकात आणखी भर पडली आहे.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *