Friday , October 23 2026
Breaking News

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; पाच जण ठार

Spread the love

 

बीड : आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील पंढरपूर–खामगाव पालखी महामार्गावर शिंदेवाडी फाट्याजवळ बस आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला असून, बसचेही मोठे नुकसान झाले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव येथील एक कुटुंब कारमधून तुळजापूरच्या दिशेने जात होते. त्यावेळी शिंदेवाडी फाट्याजवळ कार आणि बस यांच्यात भीषण धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांची नावे

1. ओमकार महादेव गिरी (वय २४)
2. गजानन महादेव नामदास (वय ३८)
3. माऊली गजानन नामदास (वय ११)
4. सोमनाथ बडे (वय २३)
5. अनिल आचार्य (वय ४०)

अपघातानंतर ग्रामस्थांचा रास्ता रोको

या भीषण अपघातानंतर शिंदेवाडी परिसरातील ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. शिंदेवाडी फाट्याजवळ रस्त्यावर असलेल्या जंपमुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

दर्शनासाठी निघालेल्या पाच भाविकांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

दुष्काळ दौऱ्यात शशिकांत शिंदेंसमोर सीमाप्रश्नाचा मुद्दा; बेळगाव-खानापूरच्या युवा शिष्टमंडळाला भेटण्याचे आश्वासन

Spread the love  रायगड (नरेश पाटील) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *