Friday , November 6 2026
Breaking News

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love

 

तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली

निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे मानकापूर येथील सरकारी शाळेचे छत उडून जाण्यासह संरक्षण भिंत कोसळून इतर साहित्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वी त्याची दुरुस्ती करण्याची सूचना तहसील प्रशासनाने संबंधित पिडिओ आणि सीआरपीना केल्या होत्या. पण त्याकडे दुर्लक्ष केल्याने तहसीलदार सुरेश मुंजे आणि तालुका पंचायत कारनिर्वाहक अधिकारी प्रवीण कट्टी यांनी मानकापूर शाळेला भेट देऊन छताची दुरुस्ती न केल्याने संबंधितांना धारेवर धरून त्यांची कान उघाडणी केली होती. याशिवाय तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले होते. पण आज तागायत दुरुस्ती झाल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांची गरज होत आहे.
सोमवारपासून (ता. १ जून) सर्वत्र शाळा सुरू झाल्या आहेत. अशा परिस्थितीत वादळी वारा आणि पावसामुळे नुकसान झालेल्या छतांची दुरुस्ती न केल्याने अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थासह पालकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दुरुस्तीचे आदेश दिले असले तरी काम झालेले नाही. त्यामुळे या कालावधीत विद्यार्थी कुठे बसणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.सध्या एकाच खोलीत अनेक वर्ग भरण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांची गरज होत आहे
तहसीलदार मुंजे यांनी, वादळी वारा आणि पावसामुळे नुकसान झालेल्या छतांची दुरुस्ती करण्याची सूचना यापूर्वी केली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. तात्काळ काम करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्याचे सांगितले. यावेळी ‌ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील म्हाकाळे, रयत संघटनेचे निपाणी तालुका उपाध्यक्ष बबन जामदार, शाखा अध्यक्ष पवनकुमार माने, ग्रामपंचायत सदस्य राजू कुंभार, प्रमोद शेवाळे, विकास वराळे, लक्ष्मण माने, राहुल वराळे यांच्यासह ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत निपाणीच्या रतिक लाखेचे दुहेरी यश

Spread the love  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग) स्पर्धांमध्ये निपाणी येथील‌ रुतिक लाखे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *