Sunday , September 20 2026
Breaking News

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला करणाऱ्यावर कारवाई करा : बोरगाव येथे निषेध मोर्चा काढून निवेदन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ बोरगाव सर्कलमध्ये दलित, समाजातील कार्यकर्ते, युवक आणि विविध सामाजिक संघटनांतर्फे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज बुलंद झाला होता.
प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर बोरगाव सर्कल येथून मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी सहकाररत्न उत्तम पाटील, सामाजिक कार्यकर्ते अश्वत माळकरी, तुषार कांबळे यांच्यासह मान्यवरांनी विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या सरकारचा निषेध असो, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
मोर्चामध्ये उत्तम पाटील, नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, उपनगराध्यक्षा रुक्साना अपराज, माजी नगराध्यक्ष पिंटू कांबळे, अमर शिंगे, तुळशीदास वसवाडे, सभापती प्रदीप माळी यांच्यासह युवक, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. सर्कल येथून निघालेला मोर्चा बोरगाव नगरपंचायत कार्यालया पर्यंत काढण्यात आला. तेथे मुख्याधिकारी स्वानंद तोडकर यांना निषेधाचे निवेदन देऊन आंदोलनकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. मोर्चावेळी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मोर्चामध्ये आंबेडकरी समाजातील कार्यकर्ते, युवक, विविध सामाजिक मंडळांचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *