Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणीत उद्या एकदिवशीय लाक्षणीक उपोषण

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : गेल्या २५ दिवसापासून जंतर मंतर दिल्ली येथे सुरू असलेल्या नीट पेपर फुटी संदर्भात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासह विद्यार्थ्यावरील झालेला लाठी चार्ज व मारहाणी प्रकरणी जाहीर निषेध नोंदवण्यासाठी निपाणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थीतर्फे‌ शनिवारी (ता.२५)‌ सकाळी १० वाजता एकदिवशीय लाक्षणीय उपोषण करून विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भाचे निवेदन भारत सरकारकडे देण्यात येणार आहे. तरी शांततेने व संविधानाच्या चौकटीत राहून होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संदीप माने, अमर दाभाडे, राहुल लाटकर, प्रवीण वंटे, किरण मेस्त्री, अमर तलवार, ओंकार भंडारी, अभिजित कांबळे, अरेश सनदी, पिंटू माने, प्रवीण सौंदळगे, ईश्वरचंद्र शिंदे, रवी कांबळे, ऋतिक कांबळे, जगदीश कांबळे, काकासाहेब कांबळे, विवेक कांबळे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *