Sunday , September 20 2026
Breaking News

श्री ज्ञानेश्वर विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळा उद्या

Spread the love

 

बेळगाव : सालाबादप्रमाणे महाद्वार रोड, तिसरा क्रॉस येथील श्री ज्ञानेश्वर विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शनिवार, दि. २५ रोजी सकाळी ११ वाजता भव्य पालखी सोहळा पार पडणार असून, त्यानंतर महारती, भजन व कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

पालखीची सुरुवात कपिलेश्वर मंदिरातून होऊन हेमू कलानी चौक, रामलिंग खिंड गल्ली, किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली, गणपत गल्ली, कागदीवेस, सवाड गल्ली, सोन्या मारुती मंदिर असा मार्गक्रमण करत पी.बी. रोडमार्गे महाद्वार रोड येथील मंदिरात समारोप होईल.

या धार्मिक सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पालखीचे दर्शन घ्यावे व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीतर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *