Monday , September 21 2026
Breaking News

हास्यकवींसाठी सुवर्णसंधी; ‘हास्यतरंग’ कार्यक्रम ८ ऑगस्टला

Spread the love

 

बेळगाव : मंथन कल्चरल अ‍ॅण्ड सोशल वेल्फेअर सोसायटी आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य संघ येथे ‘हास्यतरंग’ या स्वरचित हास्यकविता व विडंबन कविता वाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी कवींना कविता सादर करण्यासाठी तीन ते चार मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे.

कार्यक्रमाला प्रा. अशोक अलगोंडी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी नावनोंदणीची अंतिम तारीख ५ ऑगस्ट २०२६ असून, त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. इच्छुक कवींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन मंथन कल्चरल अ‍ॅण्ड सोशल वेल्फेअर सोसायटीच्या कार्यकारिणीने केले आहे.

नावनोंदणीसाठी संपर्क :

– स्मिता किल्लेकर – ७७६०९७४८४५
– अस्मिता आळतेकर – ९२४३२२०५२१

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *