Sunday , September 20 2026
Breaking News

‘बैल गेला आणि झोपा केला’; मराठी SIR अर्जाच्या मागणीवर प्रशासनाचा उशिरा खुलासा

Spread the love

 

बेळगाव : विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेसाठी मराठी भाषेतील अर्ज उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर तब्बल २५ दिवसांनंतर जिल्हा प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर अर्ज भरण्यास मदत व्हावी म्हणून कन्नड अर्जाची मराठी भाषांतरित प्रत उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र, मूळ मराठी अर्ज उपलब्ध करून देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केला आहे.

समितीच्या मते, भारतीय निवडणूक आयोगाने २००२ मध्ये भाषिक अल्पसंख्याक मतदारसंघांमध्ये संबंधित भाषेतील निवडणूक साहित्य उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच, केंद्रीय अल्पसंख्यांक आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत आयोगानेही कर्नाटकच्या निवडणूक अधिकाऱ्यांना मराठी भाषेतील अर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचनांची अद्याप प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही, असा दावा करण्यात आला आहे.

समितीचे म्हणणे आहे की, प्रशासनाने योग्य वेळी मराठीतील मूळ अर्ज उपलब्ध करून दिले असते तर बेळगावातील मराठी भाषिक मतदारांना अनावश्यक मनस्ताप सहन करावा लागला नसता. या संपूर्ण प्रकरणात जिल्हा प्रशासनाने दीर्घकाळ मौन बाळगल्याची टीकाही करण्यात आली आहे.

मराठी भाषिक मतदारांच्या सोयीसाठी केवळ भाषांतरित प्रत नव्हे, तर मूळ मराठी अर्ज उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी समितीने पुन्हा एकदा केली आहे. तसेच SIR प्रक्रियेतील पुढील सर्व अर्ज, सूचना आणि सुधारित मतदार याद्याही मराठी भाषेत उपलब्ध करून देण्याची विनंती प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *