Sunday , September 20 2026
Breaking News

सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा, मच्छे येथे आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय दिंडी सोहळा उत्साहात

Spread the love

 

मच्छे : सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा, मच्छे येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी एस डी एम सी सदस्य श्री. अमोल लाड यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विठ्ठल नामाच्या गजरात विद्यार्थ्यांनी टाळ, अभंग व भक्तिगीतांच्या साथीने दिंडी काढली. या दिंडीमध्ये श्री. बजरंग धामणेकर यांनी मुख्य मृदुंगाची साथ देत भक्तिमय वातावरण अधिक रंगतदार केले.

दिंडीतील विद्यार्थ्यांच्या हातातील समाजप्रबोधनपर फलक हे विशेष आकर्षण ठरले. “ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकोबांनी लिहिली गाथा – समृद्ध झाली मराठी भाषा”, “व्यसनमुक्त समाज घडवूया”, “वारीतील स्वच्छता राखूया” अशा विविध संदेशांद्वारे विद्यार्थ्यांनी समाजजागृतीचा प्रभावी संदेश दिला.

दिंडी गावातून मार्गक्रमण करत असताना मच्छे येथील भाविकांनी विविध ठिकाणी आरती, पूजन करून दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले. यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

या सांस्कृतिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, संत साहित्य, मराठी भाषेचे महत्त्व तसेच सामाजिक बांधिलकीची जाणीव प्रत्यक्ष अनुभवता आली.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. हा दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षकवृंद, एस डी एम सी सदस्य, पालक तसेच विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *