Sunday , September 20 2026
Breaking News

समाजसेवक जयवंत बाळेकुंद्री यांच्या हस्ते ५० विद्यार्थिनींना गणवेशांचे वितरण

Spread the love

 

बेळगुंदी : विश्व भारत सेवा समिती संचलित व्ही.बी.एस.एस. गर्ल्स हायस्कूल, बेळगुंदी येथे समाजसेवक जयवंत बाळेकुंद्री यांच्या हस्ते शाळेतील ५० गरजू विद्यार्थिनींना गणवेशांचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एम. वाय. पाटील होते. यावेळी बोलताना जयवंत बाळेकुंद्री यांनी, “विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे तसेच आपल्या परिसरातील मुलींमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने हा छोटासा उपक्रम राबविला आहे,” असे सांगितले.

कार्यक्रमाला सुनील देसाई (माजी ग्रामपंचायत सदस्य, उचगाव), गोपाळ देसुरकर (बेनकनहळ्ळी), शाळेतील ज्येष्ठ शिक्षक आर. व्ही. पाटील, मुख्याध्यापिका विद्या फाळके, तसेच शिक्षकवृंद आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतीक चौगुले यांनी केले, सूत्रसंचालन के. डी. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन विद्या फाळके यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *