Sunday , September 20 2026
Breaking News

आषाढी एकादशीनिमित्त सरस्वती विद्यामंदिर किणये शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली पायी दिंडी

Spread the love

 

बेळगाव : किणये येथील सरस्वती विद्यामंदिर, किणये शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व विठू-माऊली महिला मंडळ हरीपाठ किणये यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशी आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचा शुभारंभ शाळेच्या प्रांगणातून करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. विठ्ठल रखुमाई तसेच तुकाराम महाराज, सोपानदेव, ज्ञानदेव, चोखामेळा, मुक्ताई, जनाई यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. सर्व विद्यार्थी नटूनथटून आकर्षक वेशाभूषामध्ये शाळेत आले होते. कार्यक्रमात मुख्याध्यापक श्रीमती एस वाय बागेवाडी व विठू-माऊली महिला मंडळ हरीपाठ, किणये यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई यांची यथासांग पूजा करून, विठ्ठल-रखुमाई वारीच्या दिंडीचे महत्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितले व कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *