


निपाणी (वार्ता) : निपाणी विधानसभा मतदारसंघात विकास कामे रखडली आहेत. त्यांना चालना देण्याच्या मागणीचा निवेदन केपीसीसी सदस्य व महिला काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी सुप्रिया पाटील यांनी भेट बंगळुर येथे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आणि बेळगावचे पालकमंत्री सतीश जरकीहोळी भेट घेऊन दिली.
यावेळी निपाणी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसह सध्या सुरू असलेल्या एसआयआर मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
सुप्रिया पाटील यांनी निपाणी मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधांची गरज तसेच विविध नागरी आणि ग्रामीण भागातील प्रश्नांची माहिती पालकमंत्री जारकीहोळी यांना दिली. मतदारसंघातील विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. याशिवाय, सध्या सुरू असलेल्या एसआयआर मतदान प्रक्रियेबाबत मतदारसंघातील परिस्थिती, नागरिकांचा प्रतिसाद आणि प्रशासनाच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. विकासकामे आणि जनहिताच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेऊन संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिल्याचे सुप्रिया पाटील यांनी सांगितले. या भेटीत निपाणी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी परस्पर समन्वयाने काम करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

Belgaum Varta Belgaum Varta