Sunday , September 20 2026
Breaking News

‘पंढरीची वारी’ विषयावर राज्यस्तरीय काव्यलेखन उपक्रमाचे आयोजन

Spread the love

 

फोंडा (गोवा) : एनटीसी एड्युकॅअर ‘नवचैतन्य’ फोंडा-गोवा यांच्या वतीने राज्यस्तरीय काव्यलेखन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा दहावा उपक्रम असून यंदाचा विषय ‘पंढरीची वारी’ असा निश्चित करण्यात आला आहे.

हा उपक्रम २० जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धकांनी ‘पंढरीची वारी’ या विषयावर स्वलिखित कविता सादर करावयाची आहे.

आयोजकांनी दिलेल्या नियमांनुसार कविता किमान चार तर कमाल सहा कडव्यांची असावी. प्रत्येक कडवे चार ओळींचे असणे आवश्यक असून कविता लयबद्ध, यमकबद्ध आणि शुद्धलेखनासह असावी. कविता मराठीत टंकलिखित स्वरूपात पाठवावी. हस्तलिखित अथवा छायाचित्र स्वरूपातील कविता स्वीकारल्या जाणार नाहीत.

उत्कृष्ट कवितांना अभिप्राय देण्यात येणार असून सर्व सहभागी कवींना आकर्षक डिजिटल सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. चौर्यकर्म टाळण्याचे आवाहन आयोजकांनी केले असून सर्व कविता स्वलिखित असणे बंधनकारक आहे.

या उपक्रमाचे आयोजन नवनाथ रामकृष्ण मुळवी (एनटिसी एड्युकॅअर ‘नवचैतन्य’ फोंडा-गोवा समूह संस्थापक व ग्राफिक्सकार) यांनी केले असून कु. सोनम मंगला महेश सावंत या संकलक म्हणून कार्यरत आहेत. साहित्यप्रेमी व कवींनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगारांचा मृत्यू

Spread the love    कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *