Sunday , September 20 2026
Breaking News

दूध दरवाढीची शक्यता; प्रतिलिटर ८ रुपयांची वाढ मागण्याची तयारी

Spread the love

 

बेळगाव : महागाईचा वाढता दबाव आणि पशुखाद्यासह दूध उत्पादन खर्चात झालेली वाढ लक्षात घेता कर्नाटकात दूध दरवाढीची शक्यता निर्माण झाली आहे. दूध संघ आणि उत्पादकांकडून प्रतिलिटर ८ रुपयांची दरवाढ करण्याची मागणी राज्य सरकार आणि कर्नाटक दूध महामंडळाकडे करण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत आहेत.

दूध दरवाढीबाबत चर्चा करून सरकारकडे अधिकृत प्रस्ताव सादर करण्यासाठी कर्नाटक सहकारी दूध उत्पादक महासंघाचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे दूध उत्पादकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, उत्पादकांचे हित जपण्यासाठी प्रतिलिटर आठ रुपयांची वाढ आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, विविध जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच त्रस्त असताना दूध महागल्यास त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या मासिक खर्चावर होणार आहे. दूध ही दैनंदिन वापरातील अत्यावश्यक वस्तू असल्याने प्रस्तावित दरवाढीबाबत सरकार काय निर्णय घेते, याकडे दूध उत्पादकांसह ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *