







बेळगाव : वडगाव येथील कारभार गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ‘वडगावचा मानाचा राजा’ या गणेशमूर्तीचे शताब्दी वर्ष असल्याने मंडळातर्फे विशेष धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी गणहोम तसेच सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी ७ वाजल्यापासून भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. या धार्मिक सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री गणेशाचे दर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
शताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta