Sunday , September 20 2026
Breaking News

हार्मनी कॉलनीत सीसी रस्ता, पेव्हर रस्ता व गटार कामांना प्रारंभ

Spread the love

 

 

बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांच्या हस्ते युवा नेते अमान सेठ यांच्या उपस्थितीत हार्मनी कॉलनी येथे सीसी रस्ता, पेव्हर रस्ता तसेच गटार बांधकामाच्या विविध विकासकामांना प्रारंभ करण्यात आला.

स्थानिक नागरिकांच्या अनेक दिवसांपासूनच्या मूलभूत सुविधांच्या मागणीची दखल घेऊन ही कामे हाती घेण्यात आली आहेत. परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत करणे तसेच सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी सक्षम गटार व्यवस्था निर्माण करणे हा या कामांचा उद्देश आहे.

यावेळी आमदार राजू सेठ यांनी मतदारसंघातील विविध वसाहतींमध्ये गरजेनुसार रस्ते, गटारांसह अन्य मूलभूत सुविधांच्या विकासकामांना प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले. सुरू करण्यात आलेली कामे दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यानंतर आमदार सेठ यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून परिसरातील विविध नागरी समस्यांची माहिती घेतली. नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी अमान सेठ, स्थानिक नागरिक, महापालिका अधिकारी तसेच परिसरातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *