Sunday , September 20 2026
Breaking News

इस्कॉनमध्ये राधाष्टमी उत्साहात साजरी

Spread the love

 

बेळगाव : इस्कॉन चळवळीत श्रीमती राधा राणी यांचा जन्मदिन हा राधाष्टमी उत्सव म्हणून साजरा केला जातो. बेळगाव इस्कॉन च्या वतीने शनिवारी श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात राधाष्टमी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. त्यानिमित्त शनिवारी पहाटे मंगल आरती व श्रृंगार दर्शन झाल्यानंतर रशियाहून आलेल्या ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य श्री भक्ती विज्ञान गोस्वामी महाराज यांचे राधाष्टमीनिमित्त प्रवचन झाले. आपल्या प्रवचनात त्यांनी राधा राणीच्या जीवनाचा आढावा घेतला यावेळी ते म्हणाले की,” वृंदावन म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या विविध लिलांचे ठिकाण होय या ठिकाणी भगवंतांच्या बरोबर सर्वात जवळच्या सखी म्हणून राधा राणी होत्या. त्यांनी भगवंतांना सर्वात अधिक आनंद प्रदान केला, त्यामुळे राधा राणी यांचे स्थान भगवंताच्या जीवनात अनन्यसाधारण आहे”
याबरोबरच “धर्माचे सार प्रेम आहे आणि प्रेमाचे सार भाव आहे असे सांगून भक्ती विज्ञान गोस्वामी म्हणाले की, ” माणसाला पूर्वीच्या जन्मात आणि या जन्मात लागलेल्या ज्या अनेक वाईट सवयी असतात त्या काढून टाकून शुद्ध होणे फार कठीण काम आहे मात्र ज्या व्यक्ती अध्यात्मामध्ये येतात आणि निष्ठा अवस्था प्राप्त करतात त्यांचे मन शुद्ध होते ,त्यांचा आत्मा आपल्या दिव्य स्वरूपाचा बोध घेतो आणि भौतिक जगातील सर्वात शुद्ध अशी अवस्था प्राप्त होते” असेही ते म्हणाले.
इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी गोस्वामी महाराजांचे आभार मानले.” भक्तीत येण्यापूर्वी ते वैज्ञानिक होते आणि गेल्या 45 वर्षापासून इस्कॉन चळवळीत त्यांनी आपले आयुष्य घालवले आहे, त्यांनी रशिया, फिनलँड बरोबरच अनेक देशांमध्ये आलेल्या कठीण परिस्थिती ना तोंड देत इस्कॉन चळवळ पुढे नेली आहे. आपल्या मधुर वाणीने त्यानी भक्तीचे गुढ आणि सूक्ष्म तत्व यांचे स्पष्टीकरण अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेत केले आहे” असेही भक्तीरसामृत स्वामी म्हणाले .
भक्ती विज्ञान गोस्वामी यांनी भक्तानी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली त्यानंतर भजन, कीर्तन झाले
सायंकाळी सहा वाजता अभिषेक त्यानंतर राधाष्टमीनिमित्त परमपूज्य भक्तिरसामृत स्वामी महाराज यांचे प्रवचन झाले. रात्र साडेआठ वाजता महाआरती होऊन सर्वांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

प्रसूतीनंतर अतिरक्तस्रावाने २६ वर्षीय महिलेचा मृत्यू

Spread the love    चार वर्षांच्या मुलासह नवजात कन्येच्या डोक्यावरून आईचे मायेचे छत्र हरपले निलजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *