Sunday , September 20 2026
Breaking News

चव्हाट गल्ली स्फोट प्रकरणाला धक्कादायक वळण : स्फोटापूर्वी बकेट घेऊन आलेला अनोळखी व्यक्ती सीसीटीव्हीत कैद

Spread the love

पोलिस तपासाला नवा धागा

बेळगाव : गणेशोत्सवाच्या उत्साहात असलेल्या एका कुटुंबावर काळाचा घाला घालणाऱ्या चवाट गल्लीतील डोर गल्ली येथील स्फोट प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. १४ सप्टेंबरच्या मध्यरात्री फ्रिजचा स्फोट झाल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या सात दिवसांनंतर शेजारील घराच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्फोटापूर्वी एका अनोळखी व्यक्तीने हातात बकेट घेऊन धमोने कुटुंबाच्या घराजवळील शेडकडे गेल्याचे समोर आले आहे.

बकेट घेऊन आला अनोळखी व्यक्ती

सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती बकेट घेऊन शेडजवळ येताना दिसत आहे. काही मिनिटे परिसरात थांबल्यानंतर तो रिकाम्या हाताने तेथून घाईघाईने निघून गेल्याचेही दिसून येते. स्फोटापूर्वी या व्यक्तीच्या हालचाली झाल्याने तपास यंत्रणेसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

मात्र, सीसीटीव्हीत दिसणाऱ्या व्यक्तीचा स्फोटाशी थेट संबंध आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस तपासातूनच या बाबीचा उलगडा होणार आहे.

एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

या भीषण स्फोटात शारदा गजानन धमोने, भारती राजाराम धमोने, प्रिया गजानन धमोने आणि गंगा गजानन धमोने यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या गजानन राजाराम धमोने आणि रोशन गजानन धमोने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी मार्केट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, सीसीटीव्हीत दिसणारा अनोळखी व्यक्ती कोण? तो बकेट घेऊन शेडजवळ का आला होता? स्फोटापूर्वी तेथे नेमक्या कोणत्या हालचाली झाल्या? या प्रश्नांची उत्तरे आता पोलिस तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.

स्फोटाचे नेमके कारण आणि सीसीटीव्हीत दिसणाऱ्या व्यक्तीची ओळख तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रसूतीनंतर अतिरक्तस्रावाने २६ वर्षीय महिलेचा मृत्यू

Spread the love    चार वर्षांच्या मुलासह नवजात कन्येच्या डोक्यावरून आईचे मायेचे छत्र हरपले निलजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *