







बंगळूर : कर्नाटक राज्यातील लाखो शालेय विद्यार्थी आणि पालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील दसरा सुटीचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले असून विद्यार्थ्यांना सलग १९ दिवसांची सुटी मिळणार आहे.
राज्यातील सरकारी, अनुदानित तसेच खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना ही सुटी लागू राहणार आहे. वार्षिक शैक्षणिक वेळापत्रकानुसार ३ ऑक्टोबर २०२६पासून दसरा सुटीला सुरुवात होईल. २१ ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी सुटीचा शेवट होणार असून २२ ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू होतील.
यापूर्वी २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीची सार्वजनिक सुटी असल्याने विद्यार्थ्यांना सलग सुट्यांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे दसरा सण, कौटुंबिक कार्यक्रम तसेच पर्यटनाचे नियोजन करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळणार आहे.
दरम्यान, शैक्षणिक वेळापत्रकानुसार दुसरे सत्र २२ ऑक्टोबर २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत राहणार आहे. त्यानंतर ११ एप्रिल २०२७पासून उन्हाळी सुटी सुरू होणार आहे.
स्थानिक हवामान परिस्थिती किंवा अन्य अपरिहार्य कारणांमुळे आवश्यक असल्यास सुटीच्या वेळापत्रकात किरकोळ बदल करण्याचा अधिकार संबंधित जिल्ह्यांच्या उपसंचालकांना देण्यात आला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta