Friday , November 6 2026
Breaking News

१ नोव्हेंबर काळ्या दिनानिमित्त बोंथी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक

Spread the love

 

बिदर : १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समिती, बिदर जिल्ह्याच्या वतीने बोंथी, ता. औराद (ब), जि. बिदर येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बिदर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांसह मराठी भाषिक बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष रामराव राठोड, सचिव पृथ्वीराज पाटील, उपाध्यक्ष ॲड. भास्कर कुलकर्णी, खजिनदार नारायण पाटील तसेच सदस्य प्रा. डी. डी. शिंदे-पाटील, डॉ. संजय मुळे, विठ्ठलराव पाटील आणि राम रवणगावे यांनी हे आवाहन केले आहे.

१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या बैठकीत काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

दिवाळीत रात्री ८ ते १० याच वेळेत फटाके फोडण्यास परवानगी!

Spread the love  राज्यात केवळ हिरव्या फटाक्यांची विक्री व वापर; रुग्णालये, शाळांच्या परिसरात फटाके फोडण्यास …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *