Friday , November 6 2026
Breaking News

दिवाळीत रात्री ८ ते १० याच वेळेत फटाके फोडण्यास परवानगी!

Spread the love

 

राज्यात केवळ हिरव्या फटाक्यांची विक्री व वापर; रुग्णालये, शाळांच्या परिसरात फटाके फोडण्यास बंदी

बेळगाव : दिवाळी उत्सवादरम्यान होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी वन व पर्यावरण खात्याने राज्यभरात महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार दिवाळीत केवळ पर्यावरणपूरक हिरवे फटाके (ग्रीन क्रॅकर्स) फोडण्यास परवानगी देण्यात आली असून, रात्री ८ ते १० या दोन तासांच्या कालावधीतच फटाके फोडता येणार आहेत.

वन व पर्यावरण मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी यासंदर्भात आवश्यक निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार फटाके फोडण्यासाठी रात्रीची दोन तासांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि इतर संवेदनशील क्षेत्रांच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे.

फटाक्यांच्या आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच प्राणी-पक्ष्यांना त्रास होणार नाही किंवा त्यांना इजा पोहोचणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

दरम्यान, हिरव्या फटाक्यांचीच विक्री आणि वापर करण्याची परवानगी असल्याने विक्रेत्यांनीही नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. प्रत्येक फटाक्याच्या पाकिटावर अधिकृत ग्रीन क्रॅकरचा लोगो आणि क्यूआर कोड असणे आवश्यक आहे. या चिन्हांची खातरजमा करण्याची जबाबदारी पर्यावरण खात्याच्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. लोगो किंवा क्यूआर कोड नसलेले फटाके आढळल्यास ते तातडीने जप्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे दिवाळी साजरी करताना नागरिकांनी पर्यावरणपूरक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बस तिकीट दरवाढीच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी; अंतिम निर्णय परिवहन विभागाकडे

Spread the love  बेळगाव : महागाईचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडत चालले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *